भारतीय शेअर बाजार (Stock Market Basics)
आर्थिक बाजार (Financial Market) :
आर्थिक बाजार लोकांना शेअर्स, बॉन्ड वगैरे मध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा पुरवितात. आर्थिक बाजारात प्रामुख्याने दोन प्रकारात विभागले जाऊ शकते. ते म्हणजे रोक बाजार (मनी मार्केट) आणि टरब
रोकड बाजार (Money Market) :
मनी मार्केट मुख्यत्वे डेब्ट सिक्युरिटी, जसे की ट्रेजरी बिल इत्यादी सोबत
संबंधित असते. त्यात कमी कालावधीच्या डेब्ट इंस्ट्रूमेंटचे ट्रेडिंग होते.
कॅपिटल मार्केट / शेअर बाजार (Capital Market / Stock Market):
कॅपिटल मार्केटमध्ये शेअर्स तसेच दिर्घ कालावधीच्या डेट इंस्ट्रूमेन्ट ट्रेडिंग होत. त्यामध्ये डेब्ट आणि शेअर्स दोषांचे ट्रेडिंग होते.
Marketला दोन प्रकारच्या विभाजीत केले जाऊ शकते.
1 प्राईमरी मार्केट
2 सेकन्डरी मार्केट
• प्राईमरी मार्केटमध्ये कंपनी स्वतःचे शेअर्स लोकांना गुंतवणूक करण्यासाठी पहिल्यांदा ऑफर करते. हे एक असे माध्यम आहे की ज्याच्या मदतीने औदयोगिक क्षेत्रातील संस्था किंवा कंपन्या त्यांच्या कामगिरीच्या 'विस्तारासाठी आवश्यक असलेली रक्कम एकत्रित करतात.
• सेकन्डरी मार्केटमध्ये लिस्ट झालेल्या शेअर्सचे ट्रेडिंग केले जाते. याद्वारे लोकांना एक असा प्लॅटफॉर्म मिळतो जेथे ते शेअर्स, डेब्ट, डिबेन्चर ईत्यादीच्या खरेदी-विक्रीसाठी ट्रेडिंग करू शकतात. सध्याच्या औदयोगिक संस्थांसाठी हे एक ऊत्तम माध्यम बनले आहे. आवश्यक रक्कम भरण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना चांगला नफा तसेच नफा करत असलेल्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. भारतात सर्वच प्रादेशिक शेअर बाजाराचे एक्सचेन्ज उपलब्ध आहेत ज्यामध्ये कंपनीच्या शेअर्सचे ट्रेडिंग केले जाते. पण यामध्ये सांगण्यासारखे मुख्य दोनच एक्सचेन्ज आहेत, ज्यामध्ये जादातर शेअर्सचे चांगल्या व्हॉल्युमने ट्रेडिंग होते.