कॅन्डलस्टिक चार्टीगचा शोध हा जापानमध्ये झाला होता. म्हणून त्याला जापानी फॅन्डल नावाने पण ओळखले जाते. दुसऱ्या सर्व चार्टच्या प्रकारांच्या तुलनेत कॅन्डलस्टिक चार्टचा उपयोग सर्वात चांगला आणि सरळ आहे.
कॅन्डलस्टिक मध्ये मुख्य तीन भाग असतात.
२. अपर शॅडो
३. लोअर शॅडो
रीयल बॉडी (Real Body) :
• कॅन्डलस्टिकच्या मध्य भागाला रीयल बॉडी असे म्हटले जाते.
• रीयल बॉडीची साईज ज्या त्या दिवशी झालेल्या वाढ-घटीच्या प्रमाणावर
अवलंबून असते. • सिमित सुधार असेल तर लहान सफेद किंवा राखाडी (सुधारासाठी निश्चित
केलेल्या रंगा प्रमाणे) रंगाची कॅन्डल दिसून येते. • अगोदरच्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी मोठी वाढ किंवा गट सोबत भाव बंद झाला तर लांब कॅन्डलची रचना होते.
• सुधाराच्या दिशेतील स्थितीसाठी सफेद किंवा निळा रंग कॅन्डलसाठी वापरण्यात येतो तर घटीसाठी काळा किंवा लाल रंग वापरण्यात येतो. ही स्वतःच्या व्यक्तिगत पसंतीची बाब आहे.
जर भावात नाहीच्या प्रमाणात वाढ-घट असेल किंवा अगोदरच्या दिवसाचा
बंद भावाच्या वरच दुसऱ्या दिवशीचा बंद दिसून आला तर जी कॅन्डल
तयार होते तीला डोजी असे म्हटले जाते.
अपर शॅडो (Upper Shadow) :
अपर शॅडो या रीयल बॉडीच्या वरच्या दिशेत तयार होणारी लाईन असते जी त्या दिवसाचा महत्तम भाव दर्शविते.
लोअर शॅडो (Lower Shadow) :
• लोअर शॅडो ही रीयल बॉडीच्या खालच्या दिशेत तयार होणारी लाईन असते जी त्या दिवसाचा न्युनतम भाव दर्शविते.